Vandan Pandit

वास्तु दोष म्हणजे काय? कोणते दोष वास्तुशांतीने शांत होतात?

घर हे जीवनाचा पाया आहे. घरातील शांतता, आरोग्य, आर्थिक स्थैर्य आणि नात्यांमधील समतोल यावर घरातील उर्जेचा मोठा प्रभाव असतो. म्हणूनच आपल्या परंपरेत वास्तुशास्त्र आणि वास्तुशांती यांना विशेष महत्त्व दिले गेले आहे.

अनेकदा लोकांच्या आयुष्यात अचानक अडथळे येऊ लागतात. कामात अडचणी, घरात वाद, आरोग्याच्या समस्या किंवा आर्थिक नुकसान. अशा वेळी अनेकांना प्रश्न पडतो की हे वास्तु दोषामुळे तर नाही ना?

वास्तु दोष म्हणजे काय?

सरळ भाषेत सांगायचे तर, घराची रचना, दिशा, ऊर्जा किंवा मांडणी ही नैसर्गिक संतुलनाच्या विरुद्ध गेली तर त्याला वास्तु दोष म्हणतात.

प्रत्येक घरात पाच मूलभूत घटकांचा (पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश) समतोल असणे महत्त्वाचे मानले जाते. जेव्हा हा समतोल बिघडतो, उदाहरणार्थ चुकीच्या दिशेला स्वयंपाकघर, प्रकाश कमी असणे किंवा प्रवेशद्वार अडथळ्यांनी भरलेले असणे तेव्हा घरातील ऊर्जा प्रवाह नीट राहत नाही.

यामुळे मानसिक तणाव, अस्वस्थता किंवा सतत अडचणी येत असल्याची भावना निर्माण होऊ शकते.

हे वास्तुदोष दूर करण्यासाठी कोणती विधी करणे उत्तम मानले जाते?

वास्तुदोष दूर करण्यासाठी सर्वात प्रचलित आणि शुभ मानली जाणारी विधी म्हणजे वास्तुशांती. वास्तुशांती हा एक धार्मिक विधी मानला जातो ज्याचा मुख्य उद्देश घरातील ऊर्जा संतुलित करणे आणि नकारात्मकता दूर करण्याचा असतो. 

साधारणपणे नवीन घरात प्रवेश करण्यापूर्वी, घरात मोठे बदल किंवा नूतनीकरण केल्यानंतर, किंवा सतत अडचणी जाणवत असल्यास ही विधी केली जाते. 

मंत्रोच्चार, पूजा आणि सकारात्मक संकल्प यांच्या माध्यमातून घरात शांत, प्रसन्न आणि संतुलित वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न या विधीत केला जातो, त्यामुळे अनेकजण वास्तुदोष शांत करण्यासाठी वास्तुशांती करणे योग्य मानतात.

कोणते दोष वास्तुशांतीने शांत होतात? 

वास्तुशांती ही रचनेत बदल न करता ऊर्जा संतुलनासाठी केली जाते, त्यामुळे अनेक प्रकारचे दोष शांत होतात असे मानले जाते. घरात कोणतेही स्पष्ट कारण नसताना अस्वस्थता वाटत असल्यास हा विधी मानसिक शांतता देतो.

बांधकामातील लहान दोष, योग्य मुहूर्ताशिवाय केलेला प्रवेश किंवा काम, तसेच सतत अडथळे येत असल्याची भावना असेल तर वास्तुशांती केल्याने सकारात्मक वातावरण निर्माण होते असे अनुभव सांगितले जातात. जुने घर किंवा नूतनीकरणानंतर घरातील ऊर्जा बदलण्यासाठीही हा विधी केला जातो.

वास्तुदोष टाळता येऊ शकतात का?

अनेक वेळा वास्तुदोष पूर्णपणे टाळणे शक्य नसले तरी काही प्रमाणात कमी किंवा नियंत्रित करता येतात. घर बांधताना योग्य नियोजन, दिशांचा विचार आणि प्रकाश-हवा यांची काळजी घेतल्यास अनेक दोष टाळता येतात. 

वास्तुदोषांकडे भीतीने न पाहता योग्य सवयी आणि संतुलित दृष्टिकोन ठेवणे अधिक महत्त्वाचे मानले जाते.

प्रत्येक घर परिपूर्ण असणे शक्य नसते, पण घरात सकारात्मक वातावरण निर्माण करणे हातात असते. वास्तुशांती हा केवळ धार्मिक विधी नसून नवीन सुरुवात करण्याचा आणि घराशी भावनिक नाते अधिक दृढ करण्याचा एक सुंदर मार्ग मानला जातो.

जर तुम्ही  “Vastu Shanti Puja Mumbai”, “Vastu Shanti Pandit Mumbai”, “Pandit for Vastu Shanti”, “Vastu Shanti Puja Near Me”, “Vastu Shanti Puja Cost Mumbai”, “House Vastu Shanti Puja”, “Housewarming Puja Mumbai”, शोधत असाल, तर वंदन पंडित पुणे हा सर्वात विश्वासार्ह आणि शास्त्रोक्त पर्याय आहे.

वंदन पंडित का निवडावे?

वंदन पंडित यांच्या माध्यमातून तुम्हाला

  • पंचांगानुसार अथवा कुंडलीनुसार निवडलेला योग्य मुहूर्त
  • वैदिक शास्त्रांनुसार शुद्ध विधीपद्धती
  • आवश्यक सर्व पूजासाहित्याची सोय
  • प्रत्येक विधीचा अर्थ समजावून सांगणारे मार्गदर्शन

संपर्क 

  • महाराष्ट्रभर 1500+ प्रशिक्षित आणि प्रमाणित पंडितजींचे नेटवर्क
  • संपूर्ण पूजेची सामग्री आमच्या टीमकडून उपलब्ध
  • परंपरेनुसार शुद्ध आणि सुसंस्कृत पूजेचा अनुभव

📞 तुमची वास्तुशांती पूजा आजच बुक करा – 8104030300
🌐 संपूर्ण महाराष्ट्रभर सेवा | १५००+ वेदशास्त्रसंपन्न पंडितजींचे नेटवर्क