नवीन घरात प्रवेश करणे ही आयुष्यातील अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची घटना असते. अनेक वर्षांची मेहनत, भावनिक गुंतवणूक यानंतर जेव्हा स्वतःचे घर मिळते, तेव्हा त्या जागेत सकारात्मक ऊर्जा आणि समृद्धी यावी अशी प्रत्येकाची इच्छा असते. म्हणूनच नवीन घरात राहायला जाण्यापूर्वी वास्तुशांती पूजा करण्याला विशेष महत्त्व दिले जाते.
परंतु माहितीच्या अभावामुळे अनेक वेळा ही पूजा पूर्णपणे शास्त्रोक्त पद्धतीने केली जात नाही. काही वेळा विधी अपूर्ण राहतात, तर काही वेळा योग्य मुहूर्त, मंत्र किंवा प्रक्रिया याकडे दुर्लक्ष होते.
अशा परिस्थितीत लोकांच्या मनात एक प्रश्न नक्कीच येतो, जर वास्तुशांती पूजा शास्त्रोक्त पद्धतीने झाली नाही तर त्याचे परिणाम काय होऊ शकतात?
वास्तुशांती पूजेचा अर्थ आणि उद्देश
वास्तुशांती म्हणजे घरातील जागा, दिशा, पंचमहाभूत आणि वातावरण यांच्यात संतुलन निर्माण करण्याची एक आध्यात्मिक प्रक्रिया. शास्त्रांनुसार प्रत्येक जागेला एक ऊर्जा असते, आणि त्या ऊर्जेचे शुद्धीकरण करून सकारात्मकता निर्माण करणे हे या पूजेचे मुख्य उद्दिष्ट आहे.
जेव्हा घर बांधले जाते, तेव्हा त्या जागेवर आधी काय होते, त्या जागेतील ऊर्जा कशी आहे, बांधकामादरम्यान कोणते बदल झाले. या सर्व गोष्टींचा ऊर्जेवर परिणाम होतो असे मानले जाते. त्यामुळे वास्तुशांती पूजा करून त्या शांतता आणि मांगल्य निर्माण केले जाते.
शास्त्रोक्त म्हणजे नेमकं काय?
शास्त्रोक्त” म्हणजे शास्त्रात सांगितलेल्या नियमांनुसार, योग्य विधी, मंत्र, वेळ, दिशा आणि प्रक्रिया पाळून पूजा करणे. म्हणजेच पूजा फक्त औपचारिक न राहता तिचा प्रत्येक टप्पा परंपरेनुसार आणि योग्य पद्धतीने पार पाडणे.
यामध्ये सर्वप्रथम योग्य मुहूर्त निवडला जातो, ज्यामुळे विधी शुभ वेळेत सुरू होतो. वास्तुशांती पूजेत घरातील वास्तु आणि सकारात्मक ऊर्जेचे संतुलन साधण्यासाठी काही महत्त्वाचे टप्पे असतात. सुरुवात शरीर आणि मन शुद्ध करण्यासाठी आसन व प्राणायाम करून केली जाते, त्यानंतर संकल्प करून देवांना आमंत्रित केले जाते.
सर्वप्रथम गणेश पूजन व इतर देवतांची पूजा करूनसर्व अडथळे दूर करण्याचा शुभारंभ केला जातो आणि कुटुंबावर कृपा असावी अशी प्रार्थना केली जाते. पुढे नांदीश्राद्ध, नवग्रह पूजन आणि रुद्रमंडल पूजन करून पूर्वजांचा सन्मान केला जातो.
ग्रहदोष शांत होऊन घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. वास्तुपुरुष आणि ब्रह्मा पूजन करून वास्तुमंडल स्थापन केले जाते, ज्यामुळे घराचे संरक्षण आणि संतुलन साधले जाते. शेवटी गृहप्रवेश, होम-हवन आणि आहुती करून घरात सौभाग्य आणि शांती येईल अशी प्रार्थना केली जाते, आणि ध्यान व आरती करून पूजा विधीचा समारोप केला जातो.त्यानंतर संकल्प विधी करून पूजेचा उद्देश स्पष्ट केला जातो.अशा प्रकारे सर्व विधी एकत्रितपणे पूर्ण केल्यास पूजा शास्त्रोक्त मानली जाते.
शास्त्रोक्त पद्धतीने पूजा न झाल्यास काय होऊ शकत
जर वास्तुशांती पूजा नीट आणि शास्त्रोक्त पद्धतीने झाली नाही, तर त्याचे परिणाम जास्त करून मनावर आणि घराच्या वातावरणावर जाणवतात. काही लोकांना नवीन घरात राहायला गेल्यानंतर मन पूर्ण शांत वाटत नाही, चिडचिड किंवा तणाव जाणवतो, कारण मनात “पूजा व्यवस्थित झाली नाही” अशी भावना राहते.
कधी कधी घरात किरकोळ वाद वाढल्यासारखे वाटते किंवा कामात अडथळे येत आहेत असे जाणवते. काहींना आर्थिक बाबतीत अस्थिरता वाटते किंवा घरात वारंवार लहान समस्या होत राहतात असेही अनुभव येतात. या सगळ्या गोष्टींमागे मुख्य कारण म्हणजे मानसिक समाधानाचा अभाव कारण वास्तुशांतीचा खरा उद्देशच घराशी एक सकारात्मक आणि शांत भावनिक जोड निर्माण करणे हा असतो.
जर वास्तुशांती पूजा शास्त्रोक्त झाली नसेल तर काय करावे?
जर वास्तुशांती पूजा पूर्णपणे शास्त्रोक्त पद्धतीने झाली नसेल, तर काळजी करण्याची गरज नाही. अशा वेळी नंतरही वास्तुशांती पूजन करून घरातील ऊर्जा संतुलित करण्याचा प्रयत्न करता येतो.
घरात रोज सकाळी किंवा संध्याकाळी दीप लावणे, साधी प्रार्थना किंवा मंत्र म्हणणे यामुळेही वातावरण सकारात्मक राहण्यास मदत होते. तसेच घर स्वच्छ, हवेशीर आणि प्रकाशमान ठेवणे हीसुद्धा एक प्रकारची ऊर्जाशुद्धीच मानली जाते. नंतर हे करणे अवघड जाऊ नये म्हणूनच सुरुवातीपासूनच शास्त्रोक्त पद्धतीने करणे अधिक योग्य ठरते.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे मनात भीती न ठेवता श्रद्धा आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवणे, कारण वास्तुशांतीचा खरा उद्देश घरात शांतता, समाधान आणि चांगले वातावरण निर्माण करणे हा असतो.
तुम्ही“Vastu Shanti Puja Pune”, “Vastu Shanti Pandit Pune”, “Pandit for Vastu Shanti”, “Vastu Shanti Puja Near Me”, “Vastu Shanti Puja Cost Pune”, “House Vastu Shanti”, Puja”, “Housewarming Puja Pune”, “Authentic Vastu Shanti Puja in Pune” शोधत असाल तरवंदन पंडित हा विश्वासार्ह पर्याय आहे.
वंदन पंडित का निवडावे?
वंदन पंडित यांच्या माध्यमातून तुम्हाला
- पंचांगानुसार निवडलेला योग्य मुहूर्त
- वैदिक शास्त्रांनुसार शुद्ध विधीपद्धती
- आवश्यक सर्व पूजासाहित्याची सोय
- प्रत्येक विधीचा अर्थ समजावून सांगणारे मार्गदर्शन
संपर्क
- महाराष्ट्रभर 1500+ प्रशिक्षित आणि प्रमाणित पंडितजींचे नेटवर्क
- संपूर्ण पूजेची सामग्री आमच्या टीमकडून उपलब्ध
- परंपरेनुसार शुद्ध आणि सुसंस्कृत पूजेचा अनुभव
📞 तुमची वास्तुशांती पूजा आजच बुक करा – 8104030300
🌐 संपूर्ण महाराष्ट्रभर सेवा | १५००+ वेदशास्त्रसंपन्न पंडितजींचे नेटवर्क